खिसा असेल गरम तर सनी लिओनीसोबत २ तास घालवण्याची संधी!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत जेवण करण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. मात्र यासाठी तुमचा खिसा चांगलाच गरम असावा लागणार आहे. एका चॅरेटीसाठी सनी हे करणार असून या अंतर्गत चाहत्यांना तिच्यासोबत जेवणादरम्यान दोन तास घालवण्याची संधी असणार आहे.

सनी लिओनी बॉलिवूडमध्ये अॅक्टिंगसह चॅरेटीसाठीही काम करत असते. एका कॅम्पेनअंतर्गत अमेरिकेतील कॅन्सर सोसायटी आणि पेटाला मदत करण्यासाठी सनी लिओनी लिलावाद्वारे एका चाहत्याची निवड करणार आहे. सर्वात जास्त बोली लावणाऱ्या चाहत्यासोबत सनी जेवणासह दोन तास घालवणार आहे.

लिलावातून जवळपास २५०० डॉलर (१. ६८ लाख) मिळतील अशी सनीला आशा आहे. या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला जेवण तर मोफत मिळणार आहे, परंतु वाईनसाठी पैसे मोजावे लागणार आहे. सनीसोबत जेवण घेणारा व्यक्ती तिच्यासोबत एक फोटो आणि ऑटोग्राफही घेऊ शकणार आहे. ही भेट लॉस एंजेल्समध्ये होणार आहे. परंतु या लिलावाची एक अट असून लिलावात सहभागी होणारा व्यक्ती १८ वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा लागणार आहे.