
बॉलिवूडमधील प्रसिद्ध व गजनी चित्रपटातील अतिशय क्रूर खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योल मालवली.
प्रदीप रावत यांच्यासोबत लगान चित्रपटात काम केलेले त्यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इंस्टाग्रामवरून त्यांच्या निधनाची माहिती दिली. ”आमचा गजनी आणि लगानचा देवा प्रदीप रावत आता आपल्यात नाही. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असे यशपाल यांनी पोस्ट केले आहे.
प्रदीप रावत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात महाभारतातून केली होती. त्यात त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना खरी ओळख ‘गजनी’ चित्रपटातून मिळाली.


























































