घाटकोपर येथून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या एका बसला आग लागली असून या दुर्घटनेत बसचा वाहक किरकोळ जखमी झाला आहे.
ही बस घाटकोपरच्या गांधी नगर येथून फेरी पूर्ण करून दुपारी दीडच्या सुमारास वांद्रे येथे जात असताना बसने अचानक पेट घेतला. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझवली.