कश्मीरमध्ये सर्वकाही आलबेल नाही, लोकं भिती व दहशतीच्या छायेखाली! : आझाद

592

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 झाल्यापासून काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तिखट शब्दात केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. जम्मू-कश्मीरमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त करत आझाद यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक असून तरुणांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढून ताब्यात घेतले जात आहे. यामुळे कश्मीर खोऱ्यात भितीचे आणि दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप आझाद यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आझाद म्हणाले की, कश्मीरमध्ये सर्वकाही आलबेल नाही. कश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा खोटा आहे. लोक भिती आणि दहशतीच्या छायेखाली आहेत. पोलीस आणि लष्करी तरुणांना पकडून नेत आहे. आतापर्यंत किती लोकांना कश्मीरमध्ये अटक करण्यात आली याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच कश्मीरमधील परिस्थिती सुरळीत असल्याचा सरकारचा दावा असल्यास तरुणांना, नेत्यांना का अटक केली जात आहे? नेत्यांना घरात नजरकैद का केले जात आहे? लोकांना घराबाहेर पडण्यास का मज्जाव करण्यात आले आहे? सर्वकाही सुरळत असल्याचा दावा करता मग एवढे प्रतिबंध का लादले जात आहेत? असा सवाल करत आझाद यांनी खोऱ्यातील नेत्यांना तात्काळ सोडून देण्याची मागणीही केली. तसेच 370 कलम हटवण्याच्या निर्णयावर राज्यात कोणालाही आनंद झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या