
दक्षिण मुंबईची मानाची क्रिकेट स्पर्धा गिरगाव बॉईज आयोजित युवासेना उपसचिव व युवा व्हिजन अध्यक्ष प्रथमेश सकपाळ पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या चौथ्या पर्वाची घोषणा इस्लाम जिमखाना येथे करण्यात आली. स्पर्धा येत्या 14 व 15 मार्चला इस्लाम जिमखाना येथे दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे. याप्रसंगी मंगेश साटम, सुरेश साळुंखे, राजू काळे, नीलेश देवळेकर, मिलिंद झोरे, अभिजित देवरुखकर, विनोद खंडागळे, विनेश साळवी, गिरगाव बॉईजचे मंदार ठाकूर, निखिल ढेरे, राकेश साळवी, समीर भुवड, सिद्धेश परुळेकर, अमेय साळवी उपस्थित होते.



























































