मुसलमानांना 1947 लाच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं, गिरीराज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

847

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुसलमानांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मुसलमानांना 1947 लाच पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे होते’, असे विधान त्यांनी केले असून या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘जेव्हा आमचे क्रांतीकारी देशासाठी लढत होते तेव्हा जिन्नाह हिंदुस्थानला मुस्लीम राष्ट्र बनविण्याचा कट रचत होते. आपल्या पूर्वजांनी एक मोठी चूक केली व त्याची किंमत आपण चुकवत आहोत. जर मुस्लीम बांधवांना त्यावेळीच पाकिस्तानात पाठवले असते व हिंदूंना इथे एकत्र आणले असते. तर आज ही परिस्थिती नसती’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी सीएएबाबत बोलताना, भारतवंशियांना या देशात नाही आसरा मिळणार तर कुठे मिळणार? असा सवाल देखील केला आहे.

गिरीराज सिंह हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी  गिरीराज सिंह यांनी ‘मिशनरी शाळे जाणारी मुलं डॉक्टर इंजिनीअर तर होतात परंतु परदेशात गेल्यावर ते बीफ खातात’, असे वादग्रस्त वक्तव्य  केले होते

आपली प्रतिक्रिया द्या