पाडापाडी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, गिरीश महाजन यांचे खडसेंना आव्हान

1468

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा तर मुक्ताई नगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. यास भाजप पदाधिकारी जबाबदार असतील तर पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे पुराव्यानिशी जाहीर करा असे आव्हान भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते एकानाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवास भाजपमधील लोकच जबाबदार असल्याचा आरोप मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला होता. यासंदर्भात महाजन यांना पत्रकरांनी विचारले असता खडसे यांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. जळगाव जिह्यातील मुक्ताई नगर मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच चुरशीची असते. यापूर्वीच्या निवडणुकांत स्वतः एकानाथ खडसे येथून निवडून आले होते. यावेळेस खडसे यांना उमेदवारी दिली नव्हती. तसेच सर्व विरोधक एकवटल्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या