आश्रमशाळेतून पळालेल्या विद्यार्थिनीची घरी आत्महत्या

848

शाळेत क्रीडा स्पर्धा सुरू असताना चिठ्ठी लिहून पलायन केलेल्या चारपैकी एका विद्यार्थिनीने घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथे उघडकीस आली आहे. सारिका पाटकर (16) असे या विद्यार्थिनीचे नाव असून अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी वरवाडा येथील कन्या आश्रमशाळेत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यापैकी सारिका ही एक होती. काही दिवसांपूर्वी शाळेत क्रीडा स्पर्धा सुरू आताना या चौघींनी चिठ्ठी लिहून घरी जात असल्याचे सांगितले. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी तलासरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता तीन विद्यार्थिनी नातेवाईकांकडे सापडल्या. तर सारिका पाटकर हिने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. आईबरोबर शेतावर गेलेली सारिका एकटीच घरी परतली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली

आपली प्रतिक्रिया द्या