श्रीगोद्यांत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

436

श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घराच्या शेजारी असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाला अंगातील जर्किनने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजलेले नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील हारून सय्यद यांची दहावीत शिकत असलेली मुलगी नगिना हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरात सर्व जेवण करण्यासाठी शनिवारी रात्री बसले असता नगिना तेथे नव्हती. घरातील सर्वांनी तिची शेजारच्यांकडे चौकशी केली. मात्र, ती तेथे नव्हती. घरातल्यांनी आसपास तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला तिने जर्किनच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली. घरच्यांनी या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलीसठाण्यात दिली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस हवालदार झुंजार व पोलीस कॉन्स्टेबल भापकर तपास करीत आहेत. मृतदेहाचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास (तपास अधिकारी)झुंजार करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या