
मतदानाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले पालिका कर्मचारी हे मुंबईपासून दूर किंवा मुंबईबाहेरून ड्युटीच्या ठिकाणी येणार आहेत. यासाठी अनेकांना पहाटेच घरातून निघावे लागणार आहे. शिवाय मतदानाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या कामगारांना दुसऱ्या दिवशी कामावर येणे जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी पालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे.
























































