गेल्या 50 वर्षांत समुद्राची पातळी 8.5 सें.मी.ने वाढली 80 वर्षांत मुंबई, कोलकात्यासह अनेक शहरे बुडण्याची भीती

364

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती 

गेल्या 50 वर्षांत समुद्राची पातळी 8.5 सें.मी.ने वाढली 

गेल्या 50 वर्षात समुद्राची पातळी तब्बल 8.5 सेंटीमीटरने वाढली असून किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज मंगळवारी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाला त्यांनी लेखी उत्तर दिले.  ग्लोबल वार्ंमग संबंधी संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने  उपलब्ध केलेल्या  आकडेवारीनुसार पुढच्या 80 वर्षात मुंबई, कोलकात्यासह अनेक शहरे बुडण्याची भीती असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

दरवर्षी हिंदुस्थानी किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्याची पातळी वर्षाला 1.70 मिमी इतकी वाढ होते. हे लक्षात घेता गेल्या 50 वर्षात हिंदुस्थानी किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्याच्या पातळी तब्बल 8.5 सेमीने वाढल्याचे सुप्रियो यांनी सांगितले. उपग्रहांच्या माध्यमातून समुद्राच्या पाण्याच्या पातळीबाबतची आकडेवारी उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. त्यानुसार 2003 ते 2013 यादरम्यान समुद्राची पाणीपातळी वर्षाला 6.1 मिमीने वाढल्याचे सुप्रियो यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात हिंदुस्थानच्या किनारपट्टीवरील अनेक शहरांना वादळी वारे, सुनामी तसेच महापुराचा फटका बसला आहे. अशी माहिती सुप्रियो यांनी दिली. दरम्यान, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याबाबतची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याचेही सुप्रियो यांनी सांगितले.

कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड वाढले 

ग्लोबल वार्ंमगचा धोका प्रचंड वाढला असून सुनामी, वादळ आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींना येणाऱया काही वर्षात तोंड द्यावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार पुढे हिंदुस्थानच्या किनारपट्टीवरील शेकडो शहरांना धोका निर्माण होणार आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड वाढले असून जागतिक स्तरावर हे प्रमाण कमी केले नाही तर भयानक परिणामांचा सामना जगाला करावा लागेल असेही संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या अहवालात म्हटल्याचे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या