
गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक रघू शेटिया यांनी ‘बाँडी’ या टॅक्सी अॅपची घोषणा केली आहे. गोव्यातील वाढत्या वाहतूक गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेले हे अॅप पर्यटकांचा गोव्यातील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करणार आहे.
स्थानिक रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठी हे अॅप उपयुक्त ठरणार असून, पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये येणाऱ्या अडचणींचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.
बाँडीचे संस्थापक रघू शेटिया म्हणाले, “गोव्यातील प्रवासाची पद्धत बदलणे हाच आमचा उद्देश आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक दर्जेदार, सुरक्षित व आरामदायक बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
गोव्यातील बदलत्या पर्यटन आणि वाहतूक गरजांसाठी बाँडी हे अॅप प्रभावी ठरण्याची अपेक्षा असून, लवकरच हे अॅप राज्यभरात लाँच केले जाण्याची शक्यता आहे
प्रवाशांसाठी ‘बाँडी’ अॅप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, त्याद्वारे प्रवास अधिक सोपा, पारदर्शक आणि नियोजित होणार आहे. गोव्यात प्रवासाचे भविष्य अनुभवण्यासाठी आजच बाँडी अॅप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.