Manohar Parrikar आधुनिक गोव्याचा निर्माता हरपला, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. आधुनिक गोव्याचा निर्मात हरपला असे ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी पर्रिकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

‘मनोहर पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे निर्माता होते. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या आणि सरळ स्वभावामुळे राज्यातील ते आवडते नेते बनले. त्यांच्या योग्य नितीच्या आधारावर गोव्याच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत राहिला’, असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच मनोहर पर्रिकर हे अद्वितीय नेते होते, असेही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. देशाप्रती त्यांची निष्ठा आणि काम करण्याची पद्धत येणारी पिढी नक्कीच लक्षात ठेवेल, असेही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.