गोव्यात कोरोनाचे 94 रुग्ण आढळले

507

गोव्यात गुरुवारप्रमाणे शुक्रवारीदेखील कोरोनाचे विक्रमी रुग्ण सापडले. गुरुवारी नव्या रुग्णांची संख्या 95 होती शनिवारी तब्बल 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज 38 जण बरे होऊन घरी गेले असून सक्रिय रुग्ण 800 वर पोचले आहेत. राज्यात आतापर्यंत 1576 रुग्ण सापडले असून त्यातील 772 बरे झाले आहेत. मृतांची संख्या चार झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा धसका घेऊन 27 जुलै पासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आता फक्त एका दिवसात संपवले जाणार आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी आज सर्व पक्षीय बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला.

मांगोर हिल मधील रुग्ण संख्या 245 असून मांगोर हिलशी निगडीत रुग्ण 238 झाले आहेत.मांगोर हिल नंतर राज्य भरात कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात देखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज साखळी मधील रुग्ण 43 झाले आहेत.ताळगाव कामराभाट येथील 79 जणांच्या नुमन्याची तपासणी करण्यात आली होती.त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापलेल्या ठीकाणांमध्ये सडा(65),बायणा(66),कुडतरी(31),न्यू वाडे(39),चिंबल(27),झुवारीनगर(84),मोर्ले (22),खारेवाडा(30) आणि बाळळी(21)यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या