गोवा उपमुख्यमंत्र्याच्या फोनवरून व्हॉट्सऍप ग्रुपवर पॉर्न व्हिडीओ शेअर, गुन्हा दाखल

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या फोनवरून एका व्हॉट्सऍप ग्रुपवर पॉर्न क्लिप शेअर करण्यात आली आहे. आपला फोन हॅक करून व्हिडीओ शेअर केल्याचे स्पष्टीकरण कवळेकर यांनी दिले आहेत. तसेच सायबर सेलमध्ये त्यांनी या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

रविवारी रात्री दीडच्या सुमारास विलेजेस ऑफ गोवा या ग्रुपमध्ये कवळेकर यांच्या मोबाईलमधून एक पॉर्न क्लिप शेअर करण्यात आली. जेव्हा व्हिडीओ शेअर करण्यात आला तेव्हा मोबाईल आपल्याकडे नव्हताच. आपला मोबाईल हॅक केल्याचे कवळेकर यांनी सांगितले. गेले काही दिवस आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी कवळेकर यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या