फोन फुटल्याने अभ्यास थांबला, दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

लॉकडाऊनमुळे वडिलांचे काम थांबले, घरात खर्चाला पैसे नाही, त्यातच ज्या मोबाईलवर अभ्यास सुरू होता त्या मोबाईलचा डिस्प्ले फुटला. त्यामुळे एका अभ्यासू विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोव्यातील सट्टारी तालुक्यातील पाल गावात घडली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलाचे वडिल हे खासगी बसलवर चालक म्हणून काम करतात. लॉकडाऊनच्या आधी ते दिवसाला 700 रुपये कमवत होते. मात्र लॉकडाउननंतर तीन महिने त्यांना काहीच काम नव्हते. जून महिन्यात बस सुरू झाल्या मात्र प्रवासी कमी असल्याने दिवसाला 500 रुपये कमवायचे देखील त्यांचे वांधे होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती देखील अत्यंत बेताची झाली होती.

दहावीच्या परिक्षेची करत होता तयारी

दहावीत शिकत असलेल्या या मुलाचा घरातील एकमेव स्मार्टफोनवर ऑनलाईन अभ्यास सुरू होता. तो नियमित ऑनलाईन क्लासला बसायचा. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल हातातून पडून फुटला. त्याने याबाबत आईला सांगितले. मात्र आईन इतक्यात फोन रिपेअर करणे शक्य नसल्याचे सांगितले.

वडिलांशी झाला वाद

आईने नकार दिल्याने मुलाने याबाबत वडिलांना सांगितले. मात्र वडिलांनी सध्या माझ्या खिशात फक्त पाचशे रुपये असून दोन तीन दिवसांत तुला फोन रिपेयर करायला दोन हजार रुपये देतो असे सांगितले. त्यामुळे मुलगा वैतागला. त्यामुळे त्याचे व वडिलांचे भांडण झाले. वडिलांनी त्याची कॉलर पकडून त्याला ओरडले.

मोबाईलसाठी पैसे मिळत नसल्याने घेतला टोकाचा निर्णय

मोबाईलसाठी घरातून लगेच पैसे मिळत नसल्याने तसेच ऑनलाईन अभ्यास बुडत असल्याने या मुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

कुटुंबासह शाळेतील शिक्षकांनाही बसला धक्का

या मुलाच्या आत्महत्येने त्याचे कुटुंब खचले असून त्याच्या शाळेतील शिक्षकांना देखील धक्का बसला आहे. ‘एकूण 60 विद्यार्थ्यांपैकी अर्धीच मुलं नियमित ऑनलाईन क्लासला बसत होती. त्यातीलच एक हा होता. तो नियमित क्लासला बसायचा. त्याचा अभ्यासही पूर्ण केलेला असायचा. असे शिक्षकाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या