गोदावरीचे पात्र तुडुंब, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आठवणी केल्या जागृत

gevrai-flood

प्रदीप जोशी, गेवराई

बीड जिल्ह्यात जेमतेम पाऊस असताना तब्बल तीन लाख क्यूसेकने जायकवाडीतून गोदावरीत पाणी सोडण्यात आले आणि तब्बल 65 गोदा काठच्या गावात हाहाकार उडाला, हजारो एकर शेती वाहून गेली, शेकडो संसार उद्ध्वस्त झाली, अनेकांना आपले जीव गमवावे लागले, 14 वर्षांपूर्वीच्या या भयंकर आठवणी आज ही गोदावरी तुडूंब वाहताना काळजाचा थरकाप उडवून देत आहेत, काल 20 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले, अन पूरपरिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली.

नाशिक आणि नगर जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पैठण येथील जायकवाडी प्रकल्प तुडुंब भरला. त्यानंतर जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी पात्रात 20,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने गेवराई तालुक्यातील गोदावरीचे पात्र तुडुंब भरले आहे. ज्या गोदाकाठच्या गावात 14 वर्षापूर्वी पुराने हाहाकार माजवला होता, शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, ज्या गावात ज्या मातीत आपले उभे आयुष्य घातले त्या मातीमध्ये या पुराने आयुष्य मातीत गेली होती. पुराने हाहाकार माजवला होता . त्या कुटुंबांच्या पूर्वजांच्या स्मृतीच्या खाणा-खुणा मिटल्या होत्या, अनेकांना आपले घरदार शेती सोडून जावे लागले होते. गावकरी ओक्साबोक्शी रडत होती तो आक्रोश आणि किंकाळ्या आजही कानात घुमत आहेत. त्या पुराच्या आठवणी जागृत झाल्या आहेत. गोदावरीचे पात्र असे पुन्हा तुडुंब भरल्यानंतर आठवणींना उजळणी करताना अक्षरशः अनेक गावकऱ्यांचे कंठ दाटून आल्याचे विदारक चित्र आजही ही गोदाकाठच्या गावात दिसून आले आहे. आणि काही गावकऱ्यांनी ओक्साबोक्शी रडत काळजाचा थरकाप उडवणार्‍या आठवणी जागृत करून संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या