गोदावरी काठच्या 32 गावांना पुराचा धोका, प्रशासनाकडून अलर्ट जारी

पैठण येथील जायकवाडी धरण 97 टक्के भरले असून आज सकाळी उज व्या कालव्यातून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील 32 गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने कसल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या नाशिक व नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने व या वर्षीदेखील सर्वदूर समाधानकारक पाऊस असल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने पैठण येथील जायकवाडी धरण हे 97 टक्के भरले असून वरून आवक चालू असल्यामुळे खाली पाणी सोडण्यात आले आहे. तर उजव्या कालव्यात आज सकाळी 6 वाजल्यापासून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील 32 गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन, राजापूर, हिंगणगाव, आगर, नांदूर, पांगुळगाव, गंगावाडी, काठोडा, नागझरी, बोरगाव थडी, पांढरी, मिरगाव, रामपुरी, राहिली, मिरगाव, मनुबाई जवळा, गुंतेगाव, पाथरवाला, गोपत पिंपळगाव, श्रीपत अंतर्वाला, बोरगाव बु, गोदी खुर्द, सावळेश्वर, खामगाव, संगम जळगाव, सुरेगाव, पंचाळेश्वर या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कसल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून शासनाने या 32 गावांना खबरदारीची उपाययोजना म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या