Photo – वाहतूककोंडी फुटणार, अंधेरीचा गोखले पूल खुला होणार

पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडणारा अंधेरीचा गोखले पूल रविवार, 11 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला केला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे बांधकाम एप्रिलच्या अखेरीला पूर्ण झाले होते. मात्र, इतर कामे तसेच वाहतूक विभागाकडून हिरवा झेंडा दाखवला जाणे बाकी होते. हा पूल सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होणार असून पश्चिम उपनगरातील जुहू, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझमधील रहिवासी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्व फोटो-  रुपेश जाधव