विठुराया सजला श्रीकृष्णरुपात

सामना ऑनलाईन । पंढरपूर

गोकुळष्टमी निमित्त पंढरपूरमध्ये विठुरायाला श्रीकृष्णाचे रूप दिले आहे. अतिशय मोहक पद्धतीने विठुरायाच्या समोर फुलांची आरास करण्यात आलेली आहे.

विठ्ठल हा श्रीकृष्णाचा आवतार असल्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या उत्साहात गोकुळष्ठमी उत्सव साजरा केला जातो. याच उत्सवाचे औचित्य साधून समितीने आज देवाचा गाभारा विविध फुलांनी सजविला आहे. फुलांच्या या सजावटीमुळे देवाचे गोजीरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. या जन्मष्टमी निमित्त भावकांनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.