गोकुळधाम फेडरेशनवर सभासदांचा विश्वास

गोरेगावच्या गोकुळधाम फेडरेशनने स्वयं-पुनर्विकासाचा अभ्यास करून सर्व बाबी सभासदांसमोर ठेवल्या होत्या. त्यावेळी सभासदांनी विकासकांकडून पुनर्विकास करण्याला बहुमताने पसंती दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय मजदूर गोकुळधाम सीएचएस फेडरेशनने दिली आहे.

गोरेगावच्या गोकुळधाममधील गिरणी कामगारांची वसाहत ही जुनी वसाहत असून या वसाहतीचा पुनर्विकास ही काळाची गरज बनली आहे. या वसाहतीतील हजार परिवारांचे नेतृत्व करणारी फेडरेशन ही अधिकृत आणि उपनिबंधक कार्यालयातून घेण्यात येणाऱ्या  निवडणुकीतून निवडून आलेली कमिटी ही सभासदांच्या वतीने प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. फेडरेशन संस्था 79ए तसेच इतर नियमांचे पालन करून त्याप्रमाणे बहुमतांनी सर्व निर्णय घेत आली आहे, अशी माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.