सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, चांदी 1000 रुपये, तर सोने….

3113

शेअर बाजारातील तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारमध्ये बुधवारी सोन्याचा दर प्रतितोळा 175 रुपयांनी खाली आला. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून किलोमागे 1000 पेक्षा जास्त रुपये घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

gold1

बुधवारी बाजार उघडताच सोन्याचे दर प्रतितोळा 41201 रुपयांवरून 41019 रुपयांवर आले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली. मंगळवारीही सोन्याचा दर प्रतितोळा 162 रुपयांनी कमी झाला होता. सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीचा दर जास्त घसरला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 47693 रुपयांवरून 46610 रुपयांवर आला आहे. औद्योगित क्षेत्रात मागणी घटल्याने चांदीचा दर घसरला आहे.

gold-rate

रुपया मजबूत
बुधवारी बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी मजबूत झाला. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आता 71.21 रुपये झाली आहे. शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाल्याने रुपया वधारल्याचे एचडीएफसीच्या तपन पटेल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या