
एकिकडे आंतराराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत सुधारणा होताना दिसत आहे. दुसरीकडे सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. काही दिवसांवर आलेल्या दसरा आणि त्या पुढील दिवाळी तसंच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रतितोळा 45,800 असून गेल्या काही दिवसांपूर्वी हीच किंमत 45,950 रुपये प्रतितोळा इतकी होती. तर चांदी 57,400 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. या आधी चांदीची किंमत 57,200 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देशभर बदलतात.
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 45,800 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,960 प्रतितोळा आहे. पुण्यात प्रतितोळा 22 कॅरेट सोन्याचा दर 45,830 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,990 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रतितोळा 22 कॅरेट सोन्याचा दर 45,830 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,990 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45,830 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 49,990 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रतितोळा दर 572 रुपये आहे.



























































