सोने तीन दिवसांत पाच हजारांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात 582 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोने प्रति तोळा 1 लाख 59 हजार 823 रुपये झाले असून सोने अवघ्या तीन दिवसांत पाच हजार रुपयांनी महाग झाले आहे, तर सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातसुद्धा भरमसाट वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज 6 हजार 455 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदी प्रति किलो 2 लाख 69 हजार 367 रुपयांवर पोहोचली आहे. 24 कॅरेट सोने 1 लाख 59 हजार 823, 22 कॅरेट सोने 1 लाख 46 हजार 398 रुपये, तर 18 कॅरेट सोने 1 लाख 19 हजार 867 रुपये तोळा झाले आहे.