सोन्याला पुन्हा झळाळी; नवी दिल्लीत विक्रमी दर…जाणून घ्या आजची किंमत…

जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढायला लागल्यावर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आगमी काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. देशभरात लग्नसराईला सुरुवात होत असल्याने सोन्या- चांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,620 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी मार्च महिन्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 44 हजार रुपयांपर्यंत घसरला होता. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 46,070 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 45,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. पुण्यातही सोन्याचे हेच दर आहेत. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 44,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरणीला सुरुवात झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या दराशी तुलना केल्यास सराफा बाजारातील किमती 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाल्या आहेत. सोन्याचे दर 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आल्या होत्या.

कोरोना महामारीच्या काळात गुंतवणूकदारांना सोन्याच्या गुंतवणुकीत चांगला फायदा झाला होता. कोरोना संकटामुळे शेअर बाजारात घसरण होत होती. तर सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. जानेवारी 2020 मध्ये सोन्याचे दर 40 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होते. ते ऑगस्ट महिन्यात 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचले होते. आता जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या