सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, चांदी 78 हजार पार; जाणून घ्या आजचे दर

13785

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर विक्रम रचत आहेत. आजही यात मोठी वाढ नोंदवण्यात आली. सराफा बाजारात आज 10 ग्राम सोन्याची किंमत 56 हजार पार गेली, तर चांदीचा दर मजुरीसह प्रति किलोमागे विक्रमी 78 हजार रुपये झाला.

शुक्रवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 1 तोळ्याचा दर 56 हजार 143 रुपये झाला. सोन्यासह चांदीच्या दरातही तेजी दिसत आहे. आज चांदीच्या दरात प्रति किलोमागे 1 हजार 750 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून नवीन दर 78 हजार गेला. मात्र नंतर यात थोडी घट झाली आणि हा दर 77 हजार 802 रुपयांवर स्थिरावला.

american-dollar-gold

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर रेकॉर्ड स्तरावर गेला असून 2 हजार 78 डॉलर झाला आहे. या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 43 टक्के (23 हजार रुपयांची) वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संकट यास कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

gold

चांदीची चमक वाढली
चांदीचा दर शुक्रवारी 78 हजार जवळ पोहोचला, तर मजुरी धरून तो 78 हजार पार गेला. गेल्या 7 वर्षात पहिल्यांदाच चांदीला सोन्याचे दिवस आले आहेत. गेल्या 1 महिन्यात चांदीच्या दरात 48 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे चांदीचे दर वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

भाव आणखी भडकणार
दरम्यान, आगामी काळात सोने 60 हजार तर चांदी 80 हजार रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. सोन्यासह लोक चांदीतही गुंतवणूक करत असल्याने दर वेगाने वाढत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या