खोट्या केसांखाली लपवले 1 किलो सोने

सोने तस्कर परदेशातून सोने आणण्यासाठी काय शक्कल लढवतील त्याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी एका तस्कराने महिलांची अंतवर्स्त्र खरेदी करून त्यात लपवून सोने तस्करी केली होती. अशाच एका तस्कराच्या अतिशहाणपणाचा नमूना केरळमधील कोची विमानतळावर पाहायला मिळाला.

केरळ विमानतळावर एका तस्कराने चक्क त्याच्या डोक्यावरील खोट्या केसांच्या विग खाली तब्बल 1 किलो सोने लपवून ठेवले होते. नौशाद असे त्या व्यक्तीचे नाव असून तो केरळमधील मलप्पुरम येथील राहणारा आहे. नौशाद हा शारजाहवरून सोने येत होता. त्याने सोने आणण्यासाठी त्याच्या डोक्याच्या मधल्या भागाला टक्कल केले होते व तिथे त्याने विग लावला होता. त्या विग खाली त्याने 1 किलो सोने लपवले होते.  नौशादला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक किलो सोने जप्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या