
दोन वर्षांपूर्वी अंधेरी एमआयडीसी येथून सात कोटींच्या सोने चोरीप्रकरणी अटक केलेल्या पोलीस शिपाई संतोष राठोडला अखेर बडतर्फ केले. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राठोडच्या बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
अंधेरी एमआयडीसी येथे एक सोन्याचा कारखाना आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात काम करत असताना राठोडला त्या कारखान्याची माहिती होती. एमआयडीसी येथून ओशिवरा पोलीस ठाण्यात आल्यावर राठोडने कारखान्यात चोरीचा कट रचला. ठरल्यानुसार गॅसकटरचा वापर करून तो आत शिरला व त्याने सात कोटी रुपयांचे सोने चोरून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या कारखान्यात काम करणाऱया कर्मचाऱयांची चौकशी केली. चौकशीदरम्यान एकाचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक करून 80 लाखांचे सोने हस्तगत केले. त्याच्या चौकशीत संतोषचे नाव समोर आले.


























































