गोल्डन सँडवीच किंमत फक्त 16 हजार रुपये

बहुतेकांचा सकाळचा नाष्टा सँडवीच असतो. हॉटेलमध्ये बऱयाच प्रकारचे सँडवीच मिळतात. सॅंडवीच तयार करताना त्यात कोणते घटक वापरले जातात त्यावरून त्याची किंमत ठरते. फारफार तर 150 ते 200 रुपयांपर्यंतचे सॅंडवीच आपल्याला माहीत आहेत. परंतु न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमधील गोल्डन सॅंडवीचची जगातील सर्वात महागडे सॅंडवीच म्हणून गिनीज बुकात नोंद आहे. एका गोल्डन सॅंडविचची किंमत तब्बल 16 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे किमतीच्या बाबतीत गेल्या सात वर्षांपासून या सॅंडवीचचा रेकॉर्ड कुणीही मोडू शकलेले नाही. आता हे सॅंडवीच इतके महाग का, असा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडला आहे. सॅंडवीचमध्ये ट्रफल बटर आणि दुर्मिळ चीझचा वापर केला जातो. हे चीझ दक्षिण इटलीतून ऑर्डर केले जाते. विशिष्ट प्रजातीच्या गायीच्या दुधापासून ते तयार केले जाते. शिवाय सॅंडवीचच्या ब्रेडवर सोन्याचा वर्क लावण्यात येतो. सॅंडवीचमध्ये वापरली जाणारी सामग्रीच त्याला जगातले सर्वात महागडे सॅंडवीच बनवते. शेफ यांच्या म्हणण्यानुसार सॅंडवीचची ऑर्डर 48 तास आधी द्यावी लागते. कारण त्यासाठी लागणारे पदार्थ जमवणे थोडे कठीण काम असते.

आपली प्रतिक्रिया द्या