सोने झळाळले, दरात 460 रुपयांची वाढ

518

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत 460 रुपयांची वाढ होऊन ते 38860 रुपयांवर पोचले.  डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सोने महागले.

सोन्यासोबतच चांदीही लकाकली आहे. सोमवारी चांदीच्या दरात 1096 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 47,957 रुपयांवर जाऊन पोचला.

गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिका- चीन व्यापार युद्ध संपेल अशी आशा होती. त्यामुळे सोन्याचे भाव 1.2 टक्क्यांनी घसरले.

 

आपली प्रतिक्रिया द्या