#GOODBYE2019 इथे विचित्र पद्धतीने होते नव्या वर्षाचे स्वागत

आज 31 डिसेंबर. वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशी लोक संध्याकाळी जमा होतात. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. जगभरात बहुतांश लोक आतषबाजी, पार्ट्या करून नवं वर्षाचे स्वागत करतात. तर अनेक ठिकाणी दारू पिऊन, झिंगून नव्या वर्षाचे स्वागत करतात. परंतु असे काही देश आहेत तिथे विचित्र पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करतात.

दे दणादण

पेरू देशात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक अक्षरशः हाणामारी करतात. ताकानाकुय नावाचा एक महोत्सव आयोजित केला जातो. त्या दिवशी दोन प्रतिस्पर्धी येतात. ते दोघे एकमेकांना रक्त निघेपर्यंत मारतात. पण ही मारामारी तत्कालीन असते. त्यात द्वेष नसतो. या परंपरेचा अर्थ असा की झाले गेले ते विसरून नव्या वर्षात आता गुण्या गोविंदाने नांदा.

बडव घंटा

जपानमध्ये घंटा बडवून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. ही घंटा एक दोन नव्हे तर 108 वेळा वाजवावी लागते. जपानमधील बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार नव्या वर्षाच्या रात्री बारा वाजता 108 वेळा घंटा वाजवल्यास तो निर्वाण किंवा मोक्ष जवळ पोहोचतो.

इच्छा पिऊन टाक

रशियामध्ये वोडकाचे प्रेम हे सर्वश्रृत आहे. परंतु नव्या वर्षाची एक विचित्र परंपरा रशियामध्ये आढळते. तुमची जर कुठली इच्छा अपूर्ण असेल तर ती एका कागदावर लिहावी. तो कागद जाळावा आणि त्याची राख तुमच्या दारूच्या ग्लासात ओतावी आणि ती घटाघट प्यावी. आपलीच इच्छा आपण प्यायल्याने ती लवकर पूर्ण होते असे समजले जाते.

12 द्राक्षे खा

स्पेन देशामध्ये रात्री 12 च्या ठोक्याला द्राक्षे खाण्याची एक परंपरा आहे. 12 च्या ठोक्याला 12 द्राक्षे खायची अशी पद्धत आहे. 1909 साली ही परंपरा रूढ झाली त्यामागे कारण असे होते की तेव्हा स्पेनमध्ये द्राक्षाचे उत्पादन खूप होत असे. ते खपवण्यासाठी ही परंपरा सुरू झाल्याचे म्हटले जाते.

पिवळी चड्डी घालून मोकळी सुटकेस घेऊन फिरा

चिली या देशात नववर्ष साजरी करण्याची विचित्रच परंपरा आहे. न्युयरच्या सांयकाळी रिकामी सुटकेस घेऊन फिरल्यास तुमची सहलीची इच्छा पूर्ण होते. तसेच पिवळ्या रंगाची अंडरवेअर घालून फिरल्यास शुभ मानले जाते.

खिडकीतून पाणी फेका

प्युटो रिको या देशात नवीन वर्षाच्या सायंकाळी घराच्या खिडकीतून लोक बादलीभर पाणी फेकतात. यामुळे घरातील अतृत्प आत्मे, नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते असा समज आहे.

रंगी बेरंगी चड्ड्या घालून फिरा

मिक्सिको, ब्राझील आणि बोलिविया राज्यात एक विचित्र पद्धत आहे नववर्ष साजरे करण्याची. नववर्षाच्या सांयकाळी जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या अंडरवेअर घालून फिरल्यास तर तुमचा लाभ होऊ शकतो. तुम्ही जर लाल रंगाची अंडरवेअर घालून फिरल्यास तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळू शकते. असे काही रंगांच्या बाबतीत अख्यायिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या