
हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये 700 पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये वेगवेगळी पदे भरली जात असून अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 मार्च 2026 पर्यंत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.hindustanpetroleum.com या अधिपृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या पदांमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट, इंजिनीअर, असिस्टंट ऑफिसर, एचआर लीगल ऑफिसर, सीनियर ऑफिसर (सेल्स), मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सीनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रटेजिस्ट अँड अॅडव्हायझर यासह विविध पदांचा समावेश आहे.



























































