‘एसटी’च्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली वाहतूक सेवा देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anil-parab

महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणून एसटी बससेकेकडे पाहिले जाते. ही सेवा ग्रामीण भागात प्रकाशांना सुरळीतपणे सहज उपलब्ध होईल यावर भर दिला जाईल. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अधिकाधिक चांगली वाहतूक सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात येईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज सांगितले.

परब यांनी मंगळवारी मंत्रालयात परिवहन आणि संसदीय कार्य या विभागांचा कार्यभार स्कीकारला. त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी ग्रामीण भागातील प्रकासी मोठ्या प्रमाणात ‘एसटी’ बसने प्रकास करतात, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी शाळा, कॉलेजच्या केळेत एसटी बससेवा उपलब्ध असली पाहिजे. याचा विचार करून वेळेत बससेवा देण्यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. महामंडळाने उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या माध्यमातून कमी खर्चात चांगल्या योजना तयार करून प्रकाशांना अत्याधुनिक सुविधांसह उत्तम सेवा कशी देता येईल याचा विचार करावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. जनतेच्या सेवेसाठी महामंडळाला शासन सहकार्य करेल. प्रवाशांच्या व कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही परब यांनी सांगितले.