
जर तुम्हाला ई-मेलचा मजकूर कसा लिहायचा हे माहित नसेल तर, आता तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. आता Gmail स्वत:च ई-मेलचा मजकूर तयार करणार आहे. त्यामुळे तुमचं काम सहज सोप्प होणार आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक Google I/O 2023 कार्यक्रमादरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित बऱ्याच फीचर्सबाबत माहिती देण्यात आली. हे फिचर Gmail आणि Google Docs मधील वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, वार्षिक Google I/O 2023 कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित बऱ्याच फीचर्सबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान Gmail मधील एका खास फीचरची घोषणा यावेळी करण्यात आली. ज्यात ‘हेल्प मी राइट’ अशा या नवीन फीचरची घोषणा कंपनीने केली. हे फीचर आता आपल्याला वापरता येणार आहे. ज्यामुळे आता लोकांना स्वतः ई-मेल लिहिण्याची गरज भासणार नाही. (AI) अर्थात आर्टिफिशिअल बेस्ड लिखाण करण्यासाठी हे साधन Gmail आणि Google Docs मध्ये काम करेल. Google Workspace वर देखील याचा समावेश केला जाणार आहे. हे फीचर आता iOS आणि Android साठी उपलब्ध आहे, ज्यांनी वर्कस्पेस लॅब प्रोग्राममध्ये नोंदणी केली आहे, त्यांना सध्या याचा वापर करता येणार आहे. थोडक्यात काय तर यामुळे आपाल ई-मेल मधील मजकूर लिहिण्याचा त्रास कमी होणार असून आपल्याला सोप्या पद्धतीनं ऑटोमेटिक ई-मेल लिहिता येऊ शकेल.
























































