देशभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेकद्वारे फोटो बनवण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी गुगलने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे.
एआय जेनेरेटेड केलेल्या फोटोंचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. ही इमेज प्रॉम्प्ट्सद्वारे बनविली जातात जी कधीकधी वास्तविक दिसतात. हे लक्षात घेऊन, गुगल ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे जे AI केलेल्या इमेज आणि डीपफेकच्या घटना कमी करू शकते.
गुगलने ‘कंटेंट क्रेडेंशियल’ नावाचे टेक्नोलॉजी स्टेंडर्ड अधिक सुरक्षित असे फिचर लॉन्च केले आहे. नवीन तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केले गेले आहे.आणि कोणत्याही प्रकारच्या टेंपरिंग ते अधिक प्रभावी आहे. हे साधन AI इमेजला लेबल करण्यासाठी गुगल द्वारे वापरले जाईल. गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल इमेज ,लेन्स,आणि सर्कल टू सर्च वर दिसणाऱ्या इमेज मध्ये या फिचरची संपूर्ण माहिती मिळेल. म्हणजेच याचा अर्थ वापरकर्ते कोणत्याही फोटोच्या अबाउट इमेज विभागात जाऊन इमेज कोणत्याही प्रकारच्या एआय टूलच्या मदतीने तयार केली गेली आहे की नाही हे पाहू शकतील.