युजर्सची फसवणूक करणारे तीन धोकादायक ऍप्स गुगलने हटवले

काही दिवसांपूर्वीच गुगलने 150 धोकादायक अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवले होते. आता गुगलने लोकांना कंगाल बनविणाऱया आणखी तीन धोकादायक अॅप्सवर बंदी घातली आहे. मॅजिक फोटो लॅब-फोटो एडिटर, ब्लेंडर फोटो एडिटर आणि पिक्स फोटो मोशन एडिट ही हटवण्यात आलेल्या धोकादायक अॅप्सची नावे आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत होती. तुमच्या स्मार्टपह्नमध्ये हे अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी व्हायची फसवणूक 

हे तीन अॅप्स युजर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचे काम करायचे. युजर्सची वैयक्तिक माहिती फेसबुक लॉगिनद्वारे चोरली जायची. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रवेश करून याद्वारे मोठा गंडा घातला जायचा, असा दावा सिक्युरिटी फर्म पॅस्परस्कीने केला आहे.