
हिंदुस्थानात गुगल वॉलेट नुकतेच लाँच झाले. गुगलची वॉलेट सेवा ‘गुगल पे’पेक्षा पूर्ण वेगळी आहे. यात युजर त्यांचे डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड, क्रेडिट कार्ड डिजिटल स्वरूपात सेव करू शकतील. गुगलने अँड्रॉईड युजरसाठी वॉलेट सुरू केले आहे. डिजिलॉकरसारख्या या वॉलेटमध्ये युजर आर्थिक डेटा डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात. वॉलेट सेवेसाठी गुगलने 20 कंपन्यांसोबत करार केला आहे.























































