गोपाळकृष्ण गांधी यांनी उमेदवारी नाकारली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी देखील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढण्यास सोमवारी नकार दिला आहे. निवेदनात त्यांनी म्हटलेय, विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार केला. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. परंतु माझ्यापेक्षा अनेकजण आहेत जे चांगल्याप्रकारे काम करू शकतील. अशा व्यक्तींना संधी देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.