दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट, गोविंदापथकांच्या सरावाला ब्रेक

517

जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे यंदा पारंपारिक दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषावरही विरजन पडले आहे. मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्यावर या वर्षी निर्बंध आल्याने दहीकाल्याच्या महिनाभर आधी सुरु होणाऱ्या गोविंदापथकाच्या सरावाला ही यंदा ब्रेक लागला आहे.

दहिकाला हा हिंदुचा पारंपारिक सण आहे. श्राोवण वद्य अष्टमीला हा सण संपुर्ण देशात साजरा केला जातो. उंचावर बांधलेली हंडी गोविंदा जेव्हा थरारक मानवी मनोरे रचून फोडतात तेव्हा श्वास रोखला जातो. या हंडीतील दही-दूधाचा काला म्हणजेच दहीकाला असा हा सण आहे. उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदांना आठ ते दहा थराचे मानवी मनोरे रचावे लागत असल्याने दहीकाल्याच्या सुमारे महिनाभर आधीच गोविंदा पथकांना कसून सराव करावा लागतो. मात्र यावर्षीच्या दहिकाल्यावर कोरोनाचे गडद सावट असल्याने खेड तालुक्यातील एकाही गोविंदापथकाने सरावाला सुरवात केलेली नाही.

खेड तालुक्यात श्रीकृष्ण गोविंदा पथक, महालक्ष्मी गोविंदा पथक, जय हनुमान गोविंदा पथक, खेमनाथ गोविंद पथक,महालक्ष्मी गोविंदा पथक अशी सहा ते सात गोविंदा पथके आहेत. दहीकाल्याच्या सुमारे महिना दीड महिना आधीपासून कसून सराव केल्यानंतर ही पथके प्रत्यक्ष दहीकाल्याच्या दिवशी खेडसह दापोली, चिपळूण, मंडणगड या तालुक्यातील उंचावर बांधलेल्या हंड्या फोडतात. खेडमधील काही गोविंदा पथकांनी 9 थरापर्यंत मानवी मनोरे रचून दहीहंडया फोडतात. मात्र यावर्षी यातील एकाही गोविंदा पथकाने सरावाला सुरवात केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या