
कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आई एकविरा चषक स्पर्धेत गोराई आणि वझिरा संघात झालेल्या अंतिम सामन्यात गोराई संघ अंतिम विजेता ठरला. या स्पर्धेत 15 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात गोराई संघाने वझिरा संघासमोर चार षटकांत 45 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते. वझिरा संघ चार षटकांत 35 धावाच करू शकला. वझिरा संघाचा नितीन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, भूषण उत्कृष्ट गोलंदाज, देवेंद्र उत्कृष्ट फलंदाज तर गोराई संघाचा नायजील मालिकावीर ठरला. चाळीस वर्षांवरील खेळाडूंसाठी ही स्पर्धा लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस पाटील मोतीराम मराठे, माणिक मराठे, अध्यक्ष भास्कर कोळी, नारायण कोळी, विवेक केणी, मुकेश भंडारी, कुमार भंडारी उपस्थित होते.