गोरेगावची आदर्श विद्यालय शाळा होणार अद्ययावत

487

 विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाची गोरेगाव पश्चिम येथील आदर्श विद्यालय ही शाळा अद्ययावत होणार आहे. नुकतेच शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 1 लाख 41 हजार चौ. फूट जागेत या इमारतीचे कामकाज होणार आहे. 48 प्रशस्त डिजिटल वर्गखोल्या, विविध विषयांच्या 20 प्रयोगशाळा, 10 उपक्रम कक्ष आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी भव्य रंगमंच, खेळाचे क्रीडांगण असे शाळेचे नवीन स्वरूप असणार आहे.

आदर्श विद्यालय ही गोरेगावमधील अत्यंत जुनी शाळा असून आजवर हजारो विद्यार्थी घडवण्याचे काम शाळेने केले आहे. या शाळेच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, सरचिटणीस प्रमोद आरोलकर, माजी अध्यक्ष एस. जी. शिरोडकर, नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका श्रीकला पिल्ले, दिलीप पटेल, खजिनदार सावरकर, सचिव आरोलकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुंबईतील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शाळा निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती अत्याधुनिक साधने, सुविधा आदर्श विद्यालय या शाळेला उपलब्ध करून देण्यात येतील, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या