पाच दिवसांच्या आठवड्यांसाठी सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा संप

पाच दिवसांच्या आठवडय़ाच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांचा महासंघ ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील सरकारी बँकांमधील कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प होते. मुंबईतील अनेक बँकांमध्ये शुकशुकाट होता. बँक कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर निदर्शने केली. महिन्यातला चौथा शनिवार, त्याला लागून आलेला रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तची शासकीय सुट्टी यामुळे आज सलग चौथ्या दिवशी सरकारी बँका बंद होत्या. संपामुळे सरकारी बँकांमध्ये रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, चेक क्लिअरन्स, केवायसी, कर्ज, एनओसी तसेच इतर प्रशासकीय कामे ठप्प होती.