शेतकऱ्य़ांच्या प्रत्येक मागणीचा विचार करायला सरकार तयार – अमित शहा

शेतकऱ्य़ांच्या प्रत्येक मागणीचा विचार केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्य़ांना दिल्लीच्या मोठ्या मैदनात हलवले जाईल त्यानंतर चर्चा केली जाईल असेही अमित शहा म्हणाले आहेत.
राजधानी दिल्लीत पंजाबमधील शेतकऱ्य़ांनी आंदोलन पुकारले आहे.

शेतकऱ्य़ांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकाला विरोध केला असून हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर अमित शहा यांनी शेतकऱ्य़ांना 3 डिसेंबर रोजी चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. तसेच शेतकऱ्य़ांच्या प्रत्येक प्रश्न आणि मागण्यांचा विचार केला जाईल असेशी शहा म्हणाले आहेत.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना शहा म्हणाले की “अनेक ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये या कडाकाच्या थंडीत येत आहेत. दिल्ली पोलीस तुम्हाला एका मोठ्या मैदानात हलवण्यास तयार आहेत.” आपण तिकडे थांबावे असे आवाहन शहा यांनी केले आहे. तसेच या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. जर शेतकरी संगठना 3 डिसेंबरपूर्वी चर्चा करण्यास तयार असेल तर ठराविक ठिकाणी आपण आंदोलन करावे आम्ही चर्चेस तयार आहोत.’’ दुसऱ्य़ाच दिवशी शेतकऱ्य़ांशी संवाद साधून प्रश्न सोडवले जातील असे शहा म्हणाले.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे आवाहन

अमित शहा यांनी शेतकऱ्य़ांना आवाहन केल्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनीही शेतकऱ्य़ांना आवाहन केले आहे. शेतकऱ्य़ांनी एका ठिकाणी जाऊन आंदोलन करावे आणि केंद्र सरकारशी चर्चा करावी असे मत सिंह यांनी व्यक्त केले आहे.

अटी शर्ती नको

असे असले तरी सरकारने कुठलीही अट ठेवता कामा नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. भारतीय किसान युनियनच्या पंजाबचे अध्यक्श जगजीत सिंह म्हणाले की, अमित शहा यांनी भेटण्यापूर्वी अट ठेवली आहे. सरकारने कुठलीही अट न ठेवता चर्चा केली पाहिजे, तरच आपण चर्चा करू असे सिंह यांनी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या