शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीत वाढ करावी, काँग्रेसची मागणी

3259
balasaheb-thorat

शेतकर्‍यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून मदतीत वाढ करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा गोषवारा काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्या आकडेवारीचा आधार घेतला तर राज्याच्या सर्व विभागातील जवळपास 325 तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातही सर्वाधिक नुकसान उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झाले आहे.” राज्यापालांच्या निर्णयामध्ये मदतीकरिता घातलेल्या दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणा रनाही.  त्यातही 8 हजार रूपये प्रति हेक्टर ही मदत अत्यंत तोकडी आहे असे थोरात यांनी सांगितले.

पावसामुळे वाया गेलेल्या फळबागांना मदत म्हणून जाहीर केलेली प्रति हेक्टरी 18 हजार रूपयांची ही मदत अत्यंत अपुरी आहे. मच्छीमार बांधवांना राज्यपालांनी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करून शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीत भरीव वाढ करावी  अशी मागणी थोरात यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या