Operation Sindoor वर संसदेचे विशेष अधिवेशन होणार का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती

ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याच्या विरोधकांच्या मागणीकडे सरकार दूर्लक्ष करत आहे. सरकार लष्कराच्या ऑपरेशनवर विशेष अधिवेशन बोलवण्याचा विचार करत नाही, असे सूत्रांनी सांगितल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे की, सरकारने असे म्हटले आहे की हिंदुस्थानचे लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय सचिव यांच्याकडून घेतली जाणारी दैनंदिन पत्रकार परिषद, सर्वपक्षीय बैठका आणि पंतप्रधानांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे सर्व माहिती जनतेसमोर आधीच ठेवण्यात आली आहे. आता जम्मू-कश्मीरमधील शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर आणि सुरक्षेसंदर्भातील चिंता दूर करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलणवण्याची शक्यता कमी आहे.