सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नऊ कॅरेट, 14 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या सोन्याला मागणी वाढतेय. अशातच लवकरच नऊ कॅरेटच्या सोन्याला हॉलमार्ंकग बंधनकारक करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या तरुणाईमध्ये कमी कॅरेटच्या सोन्याला चांगली मागणी आहे. चेन चोरीच्या घटनाही खूप घडतात. या पार्श्वभूमीवर नऊ कॅरेटच्या सोन्यालाही हॉलमार्ंकग करण्याचा विचार सरकार करत आहे. मानक ब्युरोने याआधी 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांचे हॉलमार्ंकग बंधनकारक केले आहे. 2022 पासून हा नियम लागू आहे. आता नऊ कॅरट सोन्याची शुद्धता तपासून शुद्धतेचे सर्टिफिकेट दिले जाईल. सोन्याच्या वाढत्या किमती पाहून लोक नऊ कॅरेटच्या सोन्याला पसंती देताना दिसत आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 68 हजार रुपये होती, तर नऊ कॅरेट सोन्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये एवढी होती.