जुने व्हिडीओ टाकून अफवा पसरवू नका! सरकारचे आवाहन

256

सामना प्रतिनिधी, मुंबई

सांगली व कोल्हापूर जिह्यातील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून जिल्हा पातळीवरून शासन मदत करीत आहे, मात्र समाजमाध्यमांवर जुनी छायाचित्रे व व्हिडीओ दाखवून नागरिकांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत.

जुन्या पोस्ट टाकल्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण होत आहे. तरी अशी जुनी छायाचित्रे व व्हिडीओ आणि त्यासंबंधीच्या विविध पोस्ट पुनः पुन्हा पोस्ट करू नयेत. नागरिकांनीही अशा अफवावंर विश्वास ठेकू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या