प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ ग्रामसेवक युनियनचे आंदोलन

359

उदगीर तालुक्यातील ग्रामसेवक युनियनने शासनाकडीतल प्रलंबित मागण्याच्या निषेधार्थ कपाटाच्या चाव्या व शिक्के कार्यालयाकडे सुपूर्द करून आंदोलन केले. ग्रामसेवक युनियनने कपाटाच्या चाव्या व शिक्के कार्यालयाकडे जमा करताना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डि.एन.ई.-136) यांची राज्य शासनाला दिलेली नोटीस जा.क्र. 25/2019 दि.24/7/19 दिलेल्या निवेदनात शासन स्तरावर ग्रामसेवक अधिकारी संवर्गाच्या अनेक न्याय मागण्या प्रलंबित असल्यामुळे या अन्यायविरोधात लोकशाही सनदशीर मार्गाने 9 ऑगस्ट 2019 पासून राज्यभर असहकार आंदोलन पुकारलेले आहे.

आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू असून ग्रामपंचायतच्या कपाटाच्या चाव्या व शिक्के प्रशासनाकडे सुपूर्द करणे हा असल्याने 22 ऑगस्ट 2019 रोजी कार्यालयीन वेळेत सरपंच यांच्या समक्ष गावातील पंचाच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे अभिलेख ग्रामपंचायतीच्या कपाटात ठेवून कुलूप बंद केलेले आहे. तसेच सदरील कपाट हे सिलबंद केलेले असून आपल्या अधिनिस्त असलेल्या 87 पैकी 84 ग्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के आपल्या कार्यालयाकडे जमा करीत आहोत. या निवेदनावर ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष लातूर व उदगीर तालुका अध्यक्ष एन.ए. पटवारी व सचिव डी.एन. टोपरपे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या