पालघरमध्ये काळ्या जादूच्या संशयाने आजीचा केला खून, नातू फरार

प्रातिनिधिक फोटो

पालघर जिल्ह्यात काळ्या जादूच्या संशयाने नातवाने आपल्या 62 वर्षीय आजीचा खून केला आहे. खून केल्यानंतर नातू फरार झाला आहे.

पालघरच्या विक्रमगड तालुक्यात कैलास हा आपल्या आजीसोबत राहत होता. आजी काळी जादू करत असल्याने आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होत असल्याचे कैलास म्हणत होता. यावरून कैलास आणि त्याच्या आजीमध्ये खूप भांडणेही होत होती. अखेर कैलासने कुर्‍हाडीने वार करून आपल्या आजीचा जीव घेतला आणि पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या