केंद्र सरकारला धक्का, महसुलात पाच टक्क्यांनी घट

936

देशात आर्थिक मंदीत महसुलात घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा कमी झाला आहे. ऑक्टोबरमध्ये 95 हजार 380 कोटी रुपये कर जमा झाल आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक लाख कोटी रुपये कर जमा झाला होता. यंदा पाच टक्क्यांनी महसुली  घट झाली आहे. 2019 च्या सप्टेंबर महिन्यात 91 हजार 916 कोटी इतका होता. तर ऑक्टोबरमध्ये 95 हजार 380 कोटी इतका झाला आहे. म्हणजेच कर संकलनात एक लाख कोटींचा टप्पा पार पडण्यात अपयश आले आहे. गेल्या 19 महिन्यातील हा सर्वाधिक महसूल घट आहे. ऑगस्टमध्येही 98 हजार 202 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होत. देशात आर्थिक मंदी असल्याने महसुलात घट झाल्याचे म्हटले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या